Aadhar Card Voter Card link
Click to Join

Aadhar-Voter ID Link: आधार कार्ड प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचं ओळखपत्र बनलेल आहे. आपण आतापर्यंत बाकीच्या बऱ्याच कागदपत्रात आधार कार्ड जॉईन केलेलं आहे. आता भारतीय निवडणूक आयोगाने आधार कार्ड आपल्या मतदान कार्ड ला जॉईन करण्याचे आव्हान केलेलं आहे. आपण घरी बसल्या, कोणालाही पैसे न देता आपल्या मोबाईल वर आधार कार्ड मतदान कार्ड ला जॉईन करून घेऊ शकतो. चला तर आपल्या Aadhar Card ला Voter ID कसं जॉईन करायचं ते समजवून घेऊ.

अशाप्रकारे करा मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक:

  • सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल च्या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • Sign-Up या ऑप्शन वर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, नाव व मोबाईल वर येणारा OTP टाकून अकाउंट बनवून घ्यावे.
  • त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
  • त्यानंतर तुमचा EPIC क्रमांक आणि आधार क्रमांक ही माहिती भरावी.
  • त्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवल्या जाईल.
  • दिलेल्या OTP ची पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे आधार कार्ड तुमच्या मतदार ID सोबत लिंक करण्याची विनंती Submit करा.
  • त्यानंतर तुम्हाला एक Confirmation मेसेज येईल ज्यामध्ये Acknowledgement नंबर सुद्धा असेल.
  • त्यानंतर निवडणूक आयोग तुमच्या सर्व तपशीलांची पडताळणी करेल आणि तुमचं आधार कार्ड मतदान कार्ड सोबत लिंक झाल्याचा मेसेज देईल.

SMS च्या माध्यमातून आधार व वोटर आयडी कसे लिंक करायचे:

तुम्ही एसएमएस चा वापर करून सुद्धा आधार कार्ड व मतदान आयडी लिंक करू शकता. यासाठी रजिस्टर मोबाईल नंबर वरून 166 किंवा 51969 या नंबर वर ECLICK स्पेस EPIC नंबर असा मेसेज पाठवावा लागेल.

ऑफलाईन Aadhar -Voter ID अशी लिंक करा:

आधार व वोटर आयडी ऑफलाईन सुद्धा लिंक करू शकता. यासाठी तुमची आधार व Voter ID ची सेल्फ अतेस्टेड कॉपी BLO (Booth Level Officer) Officer ला द्यावी लागेल. देशाच्या प्रत्येक राज्यात BLO कॅम्प लागतात त्यामध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट करू शकता. त्यानंतर तुमचे आधार कार्ड मतदान कार्ड सोबत लिंक झाल्याचे BLO Office कडून कळविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *