bandhkam Kamgar Bhadi Yojna
Click to Join

मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 18 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत (MAHABOCW) बंधकाम कामगार योजना पोर्टल सुरू केले. हे पोर्टल महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व कामगारांना लाभ देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुमारे 12 लाख बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळाली आहे. बांधकाम कामगार कल्याण योजनेचे लाभ मिळवण्यास इच्छुक असलेल्या बांधकाम कामगारांनी mahabocw.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे व त्यानंतर “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या” अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन सहाय्यासाठी अर्ज करू शकतात. यामुळे राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्याची संधी बांधकाम कामगारांना आहे.

या लेखामध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी असलेल्या अनेक योजनांपैकी एक असलेल्या “बांधकाम कामगार योजना मोफत भांडी सेट योजना (Bandhkam Kamgar kit Yojana)” या योजनेबद्दल विस्तृतपणे माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुमच्या परिचयातील असलेल्या बांधकाम कामगाराला हा लेख नक्की शेअर करा. चला तर Bandhkam Kamgar kit योजनेची सविस्तर माहिती घेऊया.

बांधकाम कामगार कीट योजना काय आहे?

तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर या बांधकाम कामगार कीट योजनेंतर्गत 2000 रु ते 5000 रु पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे तसेच संसारासाठी लागणारे अत्यावश्यक गृहपयोगी साहित्य मिळणार आहे. याला ग्रामीण भागामध्ये सरळ भाषेमध्ये संसार बाटली (Sansar Batli) किंवा संसार किट (Sansar Kit) म्हटले जाते.

खालील वस्तूंचा या बांधकाम कामगार कीट मध्ये समावेश होतो.

 • ताट-4
 • वाटया-8
 • पाण्याचे ग्लास-4
 • पातेले झाकणासह-1
 • मोठा चमचा (भात वाटपाकरीता)-1
 • मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)-1
 • पाण्याचा जग (२ लीटर)-1
 • मसाला डब्बा (०७ भाग)-1
 • डब्बा झाकणासह (१४ इंच)-1
 • डब्बा झाकणासह (१६ इंच)-1
 • डब्बा झाकणासह (१८ इंच)-1
 • पाणी धारक-1
 • प्रेशर कुकर – 5 लिटर (स्टेनलेस स्टील)-1
 • कढई (स्टील)-1
 • स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह -1

एकूण 30 भांड्यांचा सेट मिळणार आहे.

बांधकाम कामगार कीट योजना पात्रता:

 • अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
 • कामगार अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
 • कामगाराने किमान ९० दिवस काम केले असावे.
 • कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांची नोंदणी करावी.

बांधकाम कामगार कीट योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

 • आधार कार्ड झेरॉक्स
 • उत्पन्नाचा दाखला
 • पत्त्याचा कोणताही पुरावा
 • वय प्रमाणपत्र
 • ओळख प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

बांधकाम कामगार कीट योजनेसाठी अर्ज कसा करावा:

१. सर्वप्रथम, तुम्हाला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी येथे Click करा.

२. त्यानंतर पोर्टलवर तुम्हाला तुमच्या ID आणि password ने लॉगीन कराव लागेल.

३. त्यानंतर “आपली पात्रता तपासा (Check You Eligibility)” पर्यायावर क्लिक करावे. 

४. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला “बांधकाम कामगार कीट” हि योजना निवडावी लागेल.

५. त्यानंतर तुम्ही नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरली पाहिजे.

६. त्यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. शेवटी, यशस्वीरित्या ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा.

महत्वाची सूचना: संसार बाटली भांडे वाटपाचे काम अजूनही सुरूच आहे, मात्र काही ठराविक भागात निधी थकीत आहे. इतर भागात, आचार सहिंता पूर्ण झाल्यावर वितरण सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *