बांधकाम कामगार कुटुंब नियोजन योजना
Click to Join

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ आपल्या बांधकाम कामगार बांधवांसाठी नवीन योजना राबवत असते. ज्या कामगारांची नोंदणी झालेली आहे अश्याच कामगारांना विविध योजनांचा लाभ घेता येतो. अजूनही असे बरेच बांधकाम कामगार आहेत ज्यांनी नोंदणी न केल्यामुळे अनेक योजनांपासून वंचित आहेत. महामंडळाने बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केलेली आहे ज्याच नाव आहे बांधकाम कामगार कुटुंब नियोजन योजना(Bandhkam Kamgar Kutumb Niyojan Yojna).


बांधकाम कामगार कुटुंब नियोजन योजना काय आहे?

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाने कामगार कुटुंब नियोजन योजना घोषित करून लोकसंख्या वाढीवर उपाय म्हणून महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या योजनेअंतर्गत, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत मुदत बंद ठेव म्हणून १ लाख रुपये दिले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वाच्या बाबी काय आहे?

  1. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.
  2. या साठी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  3. योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारास एकच कन्या असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  4. ही सर्व कागदपत्र स्वतःच्या स्वाक्षरीने साक्षांकित करणे आवश्यक आहे.
  5. मुलीचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  • त्यावर बांधकाम कामगार नोंदणी क्रमांकाने लॉगिन करावं लागेल.
  • त्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिलेला असेल.

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ही अर्ज करण्याची प्रक्रिया स्थगित केलेली आहे. परंतु निवडणूक संपली की लगेच या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बांधकाम कामगारांनी या कडे लक्ष असू द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *