Click to Join

जर तुम्हाला विज्ञानात रुची असेल आणि तुम्हाला त्यात भन्नाट करिअर करायचं असेल तर शास्त्रज्ञ बनण्यासाठी असणारी आयसर IISER Admission Test पात्रता परीक्षा तुम्ही दिली पाहिजे किंवा तुमच्या पाल्याला त्याबाबत जागृत केले पाहिजे. यासाठी तुम्हाला आयसर पात्रता परीक्षा 2024 साठी अर्ज करावा लागणार आहे.

भारतातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आयसर ही जगप्रसिद्ध संस्था आहे. जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या साठी ही प्रवेश परीक्षा असणार आहे. याद्वारे भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेत (IISER – Indian Institute of Science Education and Research) पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेता येणार आहे.

या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून ५ वर्षाच्या डिग्री अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येतो. आयसर परीक्षेसाठी भारतातून दरवर्षी २ ते २.५ लाख विद्यार्थी परीक्षा देतात, यातून १,९३३ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ही शास्त्रज्ञ बनवणारी संस्था भारतात फक्त सात ठिकाणी कार्यरत आहे.

आपल्या ग्रामीण भागात या परीक्षेबाबत फार कमी पालकांना माहिती आहे. त्यामुळे आपल्या संपर्कातल्या हुशार १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती पोहचवली पाहिजे.

IISER परीक्षेसाठी पात्रता काय आहे ?

आयआयएसईआर परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थी हा बारावी विज्ञान शाखेतून ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला पाहिजे. यासाठी २०२२, २०२३, २०२४ या वर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार आहे.

देशातील आयसर संस्था कुठे आहेत ?

भारतातील IISER संस्था या पुणे, भोपाळ, कोलकाता, बरहंपुर, मोहाली, तिरुपती, तिरुअनंतपुरम येथे आहेत.

आयसर प्रवेश परीक्षा २०२४ बाबत :

  • अर्ज करण्याची मुदत : १७ मे २०२४ पर्यंत
  • प्रवेशपत्र उपलब्ध होणार : १ जून
  • प्रवेश परीक्षा : ९ जून
  • जागांची संख्या : ९,१३३
  • अभ्यासक्रमाचे नाव : बीएस (B.S) / एम एस (M.S)

ही माहिती आपल्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व पालकांपर्यंत पोहचवा जेणेकरून आपल्या भागातील हुशार विद्यार्थी याचा फायदा घेऊन त्यांचं चांगल करिअर घडवू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *