Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी २०१७ ते २०२० दरम्यान आपल्या पीक कर्जाची नियमित परतफेड केलेली आहे अश्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रु पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे या योजने अंतर्गत आता कर्ज माफीची रक्कम २.५ लाख रु पर्यंत वाढवलेली आहे. या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी २०२३ प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित बँक, सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांना ही यादी सूचना फलकावर लावण्याचे आदेश शासनाने दिलेले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना काय आहे :

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्याची जमीन धारणा न बघता पात्रता बघून लागू करण्यात येते.

 1. या योजने अंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज तसेच ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेली थकबाकी (व्याज व मुद्दल मिळून) रू. २ लाख पर्यंत शासन माफ करणार आहे.
 2. रू. २ लाख पर्यंत कर्जमुक्ती ची रक्कम राज्यशासन थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात टाकणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्याची जोरदार संधी प्राप्त झाली आहे.
 3. राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध सहकारी संस्था यांच्या कडून शेतकऱ्यांनी जर पीक कर्ज/ पूनार्गठीत कर्ज घेतलेले असेल तर त्याची परतफेड राज्य शासन करणार आहे. (mahatma jyotirao phule karjmukti yojana)

नरेंद्र मोदी की पेंशन योजना २०२३

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची खास वैशिष्ट्ये :

 • शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी सहज सोपी आणि पारदर्शक पद्धती.
 • २ लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पूनार्गठीत पीक कर्ज माफ होणार.
 • कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
 • कोणतीही थकबाकी भरण्याची अट नाही.

या योजनेचा लाभ कोणता शेतकरी घेऊ शकत नाही :

 1. केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी (चतुर्थश्रेणी वगळून) जे शेतकरी सुद्धा आहेत.
 2. आजी माजी मंत्री, आमदार, खासदार जे शेतकरी सुद्धा आहेत.
 3. महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी ( ज्यांच मासिक वेतन २५ हजार पेक्षा जास्त आहे).
 4. २५ हजार रुपये पेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ती.
 5. शेती तून मिळणाऱ्या उत्पन्ना व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती.

पीएम आवास योजना 2023

या योजनेचा फायदा मिळावा यासाठी शेतकऱ्याला काय करावे लागेल :

 1. आपला आधार क्रमांक ज्या संस्थेतून, बँकेतून कर्ज घेतलेले आहे तिथे संलग्नित करावा (केलेला असेल तर पडताळून घ्यावा).
 2. आधार संलग्नित केलेल्या कर्जखात्याची माहिती संबंधित बँका किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून कर्जमुक्ती पोर्टल वर दाखल केली जाईल.
 3. प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आलेला आहे, तो क्रमांक शेतकऱ्याने जिथून कर्ज घेतले आहे तिथून मिळवावा.
 4. हा विशिष्ट ओळख क्रमांक व आधार कार्ड घेऊन “आपले सरकार सेवा (CSC)” केंद्रात जावे व आधार क्रमांकाची व कर्ज रकमेची पडताळणी करावी.
 5. पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास आपले सरकार सेवा केंद्रात माहिती द्यावी व आपले आधार प्रमाणीकरण करावे त्यानंतर नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखत्यात जमा होईल.
 6. शेतकऱ्याला कर्ज रकमे बाबत काही आक्षेप असल्यास “मान्य नाही” असे नोंदवावे त्यानंतर त्याची तक्रार आपोआप दाखल होईल व शेतकऱ्याला आपले म्हणने जिल्हाधिकारी समिती समोर मांडता येईल आणि त्यानंतर चा निर्णय ही समिती देईल.
 7. शेतकऱ्याचे एकापेक्षा जास्त कर्ज खाते असल्यास जेव्हा जेव्हा त्यांचे नाव यादीत येईल तेव्हा तेव्हा त्यांना आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन प्रमाणित करून घ्यायचे आहे.
 8. बँकांकडून सर्व कर्ज खात्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्या त्या बँका किंवा सहकारी संस्थांकडून लाभ रकमेसह लाभार्थ्यांची अंतिम यादी तुमच्या गावातील ग्रामपंचायतीवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि तुम्हाला कर्जमुक्ती प्रमाणपत्र देण्यात येईल.

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लाभार्थ्यांची तिसरी यादी २०२३ प्रकाशित झालेली आहे.

1) यवतमाळ Click Here
2) नांदेड Click Here
3) सोलापूर Click here
4) रत्नागिरी Click here
5) ठाणे Click here
6) लातूर Click here
7) जालना Click here
8) वाशिम Click Here
9) कोल्हापूर Click here
10) अहमदनगर Click here
11) बीड Click here
12) औरंगाबाद Click here
13) पुणे Click here

या योजनेच्या माहितीसाठी आणि नोंदणी करून घेण्यासाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता

Mobile No : 8600454762

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *