Mahesh Kumar
Click to Join

Mahesh Kumar UPSC Rank 1016: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी मार्फत दरवर्षी भारतातील नागरि सेवांमधील विविध महत्त्वाच्या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरता परीक्षा घेतली जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1016 उमेदवार या UPSC स्पर्धेत पास झालेले आहे. यामध्ये आदित्य श्रीवास्तव यांना देशातून प्रथम तर अनिमेष प्रधान आणि अनन्या रेड्डी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या परीक्षेत प्रथम क्रमांक कोणी पटकाविला हे तर आपण बघितले, परंतु या UPSC मध्ये सर्वात शेवटची रँक मिळवणारा म्हणजे 1016 व्या क्रमांकाने पास होणारा उमेदवार माहिती आहे का? आजच्या या लेखामध्ये UPSC मध्ये सर्वात शेवटची रँक मिळवणारा उमेदवार आणि त्याची संघर्षमय प्रेरणादायी कहानी सांगणार आहोत आणि मुख्य म्हणजे हा उमेदवार त्याच्या वयाच्या 42 व्या वर्षी यूपीएससी पास झालेला आहे.

बिहारच्या महेश कुमार यांच्या बद्दल थोडक्यात

बिहार राज्यातील मुजफ्फरपुर जिल्ह्यातील रहिवासी असणारे उमेदवार महेश कुमार यांनी UPSC 2023 परीक्षेत सर्वात शेवटची म्हणजेच 1016 वी रँक मिळवली आहे. सध्या महेश कुमार, शेखपुरा जिल्हा न्यायालयात लिपिक म्हणून काम करतात, या अगोदर त्यांनी बिहार लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रयत्न केले परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्यांनी 2013 मध्ये टीईटी उत्तीर्ण केली व त्यांची नोकरीसाठी निवड झाली त्यानंतर 2018 मध्ये त्यांना कोर्टात नोकरी लागली. नुकतीच बिहार लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक भरती स्पर्धेत परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची माध्यमिक शिक्षक म्हणून निवड झालेली आहे आणि सोबतच UPSC परीक्षेतही त्यांना घवघवीत यश प्राप्त झाले आहे.

महेश कुमार यांचा संघर्षमय जीवन प्रवास

42 व्या वर्षी यूपीएससी पास झालेले असले तरीही त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा खूपच संघर्षमय राहिलेला आहे. महेश कुमार हे 1995 ला आपल्या गावामध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत टॉपर आले होते त्यानंतर त्यांना पुढील शिक्षण घ्यायचे होते परंतु घरील अत्यंत गरिबीच्या आणि आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणात गॅप घ्यावा लागला आणि रोजंदारीने कामाला जावे लागले.

तब्बल अकरा वर्षानंतर त्यांनी बारावीला प्रवेश घेतला आणि 2008 मध्ये त्यांनी बारावी सुद्धा चांगल्या मार्काने पास केली. त्यानंतर त्यांनी 2011 मध्ये आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची सुद्धा तयार सुरू केली.

बिहार लोकसेवा आयोगातील अपयश आणि UPSC मधील यश

न्यायालयात लिपिक म्हणून नोकरीवर लागल्यानंतर सुद्धा त्यांना युपीएससी मधून सनदी सेवा अधिकारी व्हायचं स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगलं होतं. त्यासाठी त्यांनी प्रचंड तयारी सुरू केली होती. न्यायालयाच्या नोकरीत असताना सुद्धा वेळ मिळेल तेव्हा त्या अभ्यास करायचे तसेच न्यायालयात जाण्यापूर्वी दोन तास अभ्यास करायचे आणि रात्री खूप उशिरापर्यंत अभ्यासात आपलं वेळ ते द्यायचे.

न्यायालयात लिपिक म्हणून नोकरी लागण्याआधी बिहार पब्लिक सर्विस कमिशनच्या दोन परीक्षेत ते इंटरव्यू पर्यंत जाऊन पोहोचले होते परंतु फक्त दोन मार्क कमी पडल्यामुळे त्यांना त्यामध्ये यश आलं नाही. सुरुवातीला खूप आर्थिक संकटांच त्यांना सामना करावा लागला, त्यामुळे मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर अकरा वर्षांनी त्यांनी बारावीचा अभ्यास सुरू केला. नोकरी लागल्यानंतर त्यांची आर्थिक अडचण थोडी दूर झाली आणि त्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून आपल्या धेयप्राप्तीकडे वाटचाल सुरू केली.

महेश कुमार यांचे वडील धान्ये विकायचे

महेश कुमार यांचे वडील बाजारात डाळ तांदूळ विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते महेश यांना सात भाऊ बहीण असल्याने त्यांच्या वडिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे फारच कठीण जात होते. मात्र या परिस्थितीतही हिम्मत न हारता महेश यांनी आपल्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केलं याबाबत महेश यांचे वडील महेंद्र शहा यांनी सांगितले की, “मी बाजारात डाळ आणि तांदूळ विकायचो पण आज मुलगा अधिकारी झाल्यामुळे आमच्या कुटुंबाला अतिशय आनंद झालेला आहे”.

मित्रांनो, महेश कुमार यांची ही प्रेरणादायी सक्सेस स्टोरी तुम्हाला नक्कीच प्रेरित करून गेली असेल. तुम्ही सुद्धा आपल्यासमोर असलेल्या अडीअडचणींना पार करून ठरवलेल्या लक्षासाठी पाठलाग करून उचित असलेल्या ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नात कमी पडणार नाही अशी आम्हाला आशा आहे. उज्वल भविष्यासाठी माहिती मंचच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *