Click to Join

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून पेट परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. यंदाची PET परीक्षा ऑनलाइन होणार आहे जी मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे विद्यापीठचे नियोजन आहे. ७ नोव्हेंबर २०२२च्या निर्णयानुसार आता पीएचडीला प्रवेश घेतल्यानंतर संबंधित संशोधकास मार्गदर्शन करणारे गाइड त्या पदव्युत्तर महाविद्यालयात प्राध्यापक असणे आवश्यक आहे.

आता विद्यापीठासह जिल्ह्यातील अनेक उच्च महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय झाली आहे. विद्यापीठातील विविध संकुलांप्रमाणे त्या-त्या महाविद्यालयांमध्ये देखील संशोधकांना पीएचडी पूर्ण करता यावी हा त्यामागील हेतू आहे. तसेच पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना निवडलेल्या विषयासंदर्भातील ज्ञान ज्याठिकाणी मिळेल त्याठिकाणी जाऊन संशोधन करता येईल.

नेट-सेट उत्तीर्ण उमेदवारांना ‘पेट’चे बंधन नाही

वरिष्ठ महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (युजीसी) घेतली जाणारी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ‘सेट’चेही असेच आहे. या उमेदवारांना ‘पीएचडी’च्या पेट देण्याचे बंधन नाही, असेही ‘युजीसी’ने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पीएचडीधारकांसाठी आता बार्टी, सारथी यासह १० ते १२ फेलोशिप मिळतात. तसेच केंद्र व राज्य सरकारकडूनही अनुदान दिले जाते. याशिवाय विद्यापीठाच्या संकुलात पीएचडी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे आता पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्यांना पदरमोड करण्याची गरज पडणार नाही, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *