Click to Join

सन 2022-2023 ला झालेल्या पोलीस शिपाई भरतीसाठी अनेक उमेदवारांनी एकपेक्षा जास्त जिल्ह्यातून अर्ज भरला होता. महाराष्ट्रातून २८९७ उमेदवारांनी असा अनेक जिल्ह्यातून अर्ज भरला होता. पोलीस भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्याबद्दल या उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आले होते.

त्यानंतर या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायमूर्ती ए, एस. चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या.

हा निकाल देतांना उच्च न्यायालयाने आपले स्पष्ट मत व्यक्त करतांना सांगितले कि ” मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.”

पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकच अर्ज करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आपण विविध घटकात केलेल्या अर्जापैंकी एका पदाकरीता कोणत्याही एका घटकाचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राहय धरण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करुन त्याप्रमाणे हमीपत्र भरुन देण्यासाठी वित्तक हॉल, पोलीस मुख्यालय, येथे दिलेल्या तारखेला आणावे. सोबत येताना आवेदन अर्जाची व आधारकार्ड ची छायांकित प्रत तसेच मुळ आधारकार्ड न चुकता आणावे. असा मेसेज उमेदवारांना प्राप्त झाला आहे.

जिल्हा निहाय डबल फॉर्म भरलेल्या उमेदवारांना खालील हमीपत्र भरून द्यायचं आहे.

Police-Bharti-Double-Form-Hami-Patra-Format
Police-Bharti-Double-Form-Hami-Patra-Format

जिल्हा निहाय डबल फॉर्म भरलेल्या उमेदवारांच्या नावाच्या याद्या खाली दिलेल्या आहे.

  • जळगाव पोलीस डबल फॉर्म भरलेल्या उमेदवारांची यादी :
  • नागपूर पोलीस डबल फॉर्म भरलेल्या उमेदवारांची यादी
  • पुणे पोलीस डबल फॉर्म भरलेल्या उमेदवारांची यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *