PVC Pipe Yojna
Click to Join

PVC Pipe Yojna 2024 पाईपलाईन अनुदान योजना काय आहे ?

प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये पाईपलाईन करणे गरजेचे असते पाईपलाईन असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी अतिशय मदत होते. जर एखाद्या शेतकऱ्याकडे पाईपलाईन नसेल तर शेतकऱ्याला पिकांना पाणी देण्यासाठी खूप अडचणी येते, तसेच पाईप साठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. शेतकऱ्यांची हि गरज ओळखून महाराष्ट्र कृषी विभागाने PVC Pipe Yojna आणली आहे. हि एक चांगली संधी शेतकऱ्यांसाठी चालून आली आहे, याअंतर्गत पीव्हीसी पाईप या पाईप साठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे व या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कोठे करायचा ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

पीव्हीसी पाईप योजनेत अनुदान किती मिळेल ?

मित्रांनो, पीव्हीसी पाइप योजनेसाठी कृषी विभाग प्रत्येक शेतकऱ्याला पाईप खरेदीसाठी 50% अनुदान देते. हे अनुदान जवळपास १५ हजार असते. या अनुदानासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.

  • तुम्ही जर HDP पाईप साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 50 रुपये प्रति मीटर व जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंतच्या पाईप साठी अनुदान हे दिले जाते
  • तुम्ही जर फक्त PVC पाईप साठी अर्ज केला असेल तर तुम्हाला 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त 500 मीटर पाईप साठी अनुदान हे दिले जाते.
  • हे अनुदान प्राप्त करण्यासाठी, तुमच्या जमिनीचा सातबारा, ८अ उतारा व ज्या दुकानातून तुम्ही पीव्हीसी पाईप खरेदी करणार त्या दुकानाचं कोटेशन बिल व तुमच बँक पासबुक तुम्हाला Mahadbt या पोर्टल वर अपलोड करावे लागते त्यानंतर याची संपूर्णपणे छाननी झाल्यानंतर हे अनुदान डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यात दिले जाते.

पीव्हीसी पाईप योजनेसाठी पात्रता काय आहे ?

मित्रांनो, या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. या बाबी बारकाईने वाचून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात कि नाही हे ठरवून घ्या आणि नंतरच या योजनेसाठी अर्ज करा.

  • पहिली अट हि आहे कि तुमच्या मालकीची जमीन असली पाहिजे आणि तुमच्याकडे सातबारा ८-अ नमुना असला पाहिजे.
  • या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी तुमच्या शेतात बोअरवेल / विहीर / शेततळे यापैकी एक असले पाहिजे. तसेच तुमच्या सातबारा वर याची नोंद असली पाहिजे. जर बोअरवेल / विहीर / शेततळे याची नोंद सातबारा वर नसेल तर ती तलाठी च्या माध्यमातून करून घ्यावी, तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर च्या जवळपास जमीन असणे बंधनकारक आहे.

पीव्हीसी पाईप योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

पीव्हीसी पाईप किंवा एचडीपी पाईप साठी अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या पद्धतीप्रमाणे अर्ज करावा लागेल, अर्ज केल्यानंतर कृषी विभाग या योजनेसाठी शेतकऱ्याची निवड ही लॉटरी पद्धतीने करत असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला लॉटरी लागेल त्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मिळेल.

चला तर पीव्हीसी पाईप योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघूया.

१. सर्वप्रथम महाराष्ट्र कृषी विभागाच्या MahaDBT Farmer Portal च्या लिंक वर जावे.

२. महाडीबीटी फार्मर लॉगिन या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड किंवा बायोमेट्रिक टाकून लॉगिन करून घ्यायची आहे जर तुमची या ठिकाणी ID नसेल किंवा पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करावी लागणार आहे.

३. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करा असा एक रकाना दिसेल या रकान्यामध्ये एक निळे बटन आहे त्यावरती वरती Click करा. आता या ठिकाणी तुम्हाला बरेच पर्याय दिसतील.

४. त्यानंतर यामध्ये तुम्हाला “सिंचन साधने व सुविधा” या पर्यायावर Click करायचं आहे. आता तुमच्या समोर एक अर्ज ओपन होईल या अर्जामध्ये तुम्हाला काही वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्वेक्षण क्रमांक व गट क्रमांक टाकायचे आहेत, हि माहिती तुम्हाला सातबारा मध्ये मिळेल.

५. त्यानंतर तुम्हाला लागणारा पाईप निवडण्याच्या पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला पाईपची लांबी मीटर मध्ये निवडायची आहे ही जास्तीत जास्त लांबी 428 मीटर पर्यंत असते आणि कमीत कमी 60 मीटर पर्यंत असते अर्जदाराला आपल्या गरजेनुसार पाईप ची माहिती द्यायची आहे.

६. या सर्व बाबी भरल्यानंतर तुम्हाला यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. हे शुल्क फक्त २३ रुपये 60 पैसे इतके असणार आहे.

७. शुल्क भरण्यासाठी वेगवेगळ्या पेमेंट पर्याय दिलेले असेल, तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या Online Payment Method चा वापर करू शकता.

८. जर आता तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला मेसेज येईल, निवड झाल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे ही कागदपत्रे तुम्हाला निवड झाल्यावरच अपलोड करावे लागणार आहे आणि ही संपूर्ण सूचना तुम्हाला या महाडीबीटी फार्मर लॉगिन च्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मेसेज द्वारे कळवण्यात येईल.

हे सुद्धा वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *