RTE 2024-25
Click to Join

RTE Admission Process: महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2024 पासून आरटी प्रवेश 2024-25 साठी अर्ज स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र आरटीई (RTE) प्रवेश प्रक्रिया चा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील सगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मूळ शिक्षणाच्या अधिकार प्रदान करणे हा आहे. या अंतर्गतच 25 टक्के सीट हे आरक्षित करण्यात आले आहे. आपल्या पाल्याचा आरटीई अंतर्गत जर प्रवेश करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करावा लागेल.

शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 2024-25 साठी महाराष्ट्र शासनाने 75 हजार पेक्षा अधिक शाळांवर RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. याकरिता 30 एप्रिल पर्यंत आपल्याला प्रवेश प्रक्रिया साठी अर्ज करायचे आहे. याकरिता आई-वडिलांकडे आपल्या पाल्याचे सगळे कागदपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे. Online Application करण्यासाठीची प्रक्रिया महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांच्या व खेळ विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र आरटीई(RTE) प्रवेश प्रक्रिया Important Highlight:

Admission for Year2024 – 2025
StandardsPrimary to 8th standard
Name of DepartmentSchool Education and Support Department, Government of Maharashtra
Application modeOnline
Last date to Apply30 April 2024
Official websiteClick Here

आरटीई 25% प्रवेश प्रक्रिये करिता लागणारे महत्त्वाचे कागदपत्र महत्त्वाच्या बाबी:

 • जन्म तारखेच्या पुरावा.
 • जात प्रमाणपत्र पुरावा.
 • उत्पन्नाचा दाखला (पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे).
 • दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा (दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल).
 • सन 2024-2024 शैक्षणिक वर्षापासून आरटीई 25% टक्के प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्या करिता रेशन कार्ड,Driving License, Property Tax Receipt, Aadhar Card, Voter ID, Passport, Nationalized Bank Passbook यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा.
 • सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
 • भाडेतत्त्वावर राहणारा पालकांकरिता भाडेकरारनामा. (भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांक च्या पूर्वीचा असावा व त्याच्या कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कारदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आरटीई मधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाला भरावी लागेल.)
 • पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना Single Parent पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र धरण्यात ग्राह्य धरण्यात येईल.
 • ज्या बालकांनी पूर्वी आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत 40 प्रवेश घेतल्या असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
 • प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल.
 • पालकांनी केवळ एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.

आरटीई 25% प्रवेश प्रक्रिये करिता महाराष्ट्रात जिल्ह्यानुसार उपलब्ध असलेल्या जागा:

DistrictRTE SchoolsRTE Vacancy
Ahmadnagar3933512
Akola2012337
Amravati2432486
Aurangabad5845043
Bhandara94897
Bid2262787
Buldana2312785
Chandrapur1971807
Dhule1031259
Gadchiroli75704
Gondiya141897
Hingoli70619
Jalgaon2873594
Jalna2903567
Kolhapur3453486
Latur2352130
Mumbai2975771
Mumbai701431
Nagpur6806797
Nanded2463252
Nandurbar45442
Nashik4475553
Osmanabad132978
Palghar2715053
Parbhani1631363
Pune97217057
Raigarh2664480
Ratnagiri90934
Sangli2261954
Satara2362131
Sindhudurg51347
Solapur3292764
Thane66912915
Wardha1221347
Washim1011011
Yavatmal2001701

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2024-25 करता Application करण्याची प्रक्रिया:

 1. महाराष्ट्र आरटीई (RTE) प्रवेश प्रक्रिया च्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
 2. पालकांकरिता सूचना असलेला परिपत्रक डाऊनलोड करावे व सर्व माहिती बारकाईने वाचून घ्यावी.
 3. त्यानंतर परत Home पेजवर जाऊन Online Application या टॅब वर क्लिक करावे.
 4. त्यानंतर New Registration लिंक वर क्लिक करून आपले संपूर्ण माहिती भरून Registration Complete करावे.
 5. त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या Application Number आणि Password ने Login करून राहिलेल्या इतर बाबी भरून अर्ज पूर्ण करावा.
 6. सर्वात शेवटी Submit बटन वर क्लिक करून अर्ज पूर्ण करावा व त्याची एक प्रत डाऊनलोड करून तुमच्याकडे ठेवावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *