समाजातील सर्व घटकांना शिक्षण घेता यावे यासाठी संविधान निर्मात्यांनी भारतीय राज्यघटनेत “शिक्षणाचा अधिकार (Rights To Education)” ची तरतूद करून ठेवलेली आहे. या अधिकारामुळे आतापर्यंत कित्येक व्यक्ती जिल्हा परिषदेच्या शाळेमधून किंवा अनुदानित शाळेतून शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर पोहचले आहेत. अलीकडे, शिक्षण घेण्याबद्दल लोकांच्या मानसिकतेमध्ये झालेला बदल असेल किंवा शासकीय / नावाजलेल्या अनुदानित शाळेतील शिक्षणाचा घसरलेला दर्जा असेल, यामुळे खाजगी शाळेचं पेव फुटलेले आहे. खाजगी शाळा सुद्धा उत्तम शिक्षण या नावाखाली भरमसाठ फी पालकांकडून वसूल करून घेतात. यामधे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पालक फसला जातो. त्यामुळे कोणताही बालक चांगल्या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनातर्फे RTE अंतर्गत २५% आर्थिक दुर्बल व वंचित बालकांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो.
आज तुम्हाला याच RTE मोफत प्रवेश प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती सादर करत आहे.
Blog Content
RTE मोफत प्रवेश म्हणजे काय ?
आपण टीव्ही वर ” पढेगा इंडिया तो बाढेगा इंडिया ” हे स्लोगन ऐकलं असेल.भारत सरकारच्या शैक्षणिक योजनेच्या धोरणानुसार प्रत्येक खासगी शाळेत २५% वंचित व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळेत ऑनलाईन अर्ज करून प्रवेश दिल्या जातो. या साठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जातो. या साठी RTE प्रवेश प्रक्रिया अंतर्गत शाळांची नोंदणी पूर्ण झालेली असली पाहिजे.
RTE मोफत प्रवेश 2023 साठी कोणते कागदपत्र लागतील ?
1.निवासी पुरावा :
- RTE मोफत प्रवेश योजनेअंतर्गत ज्या कार्यक्षेत्रातील शाळा आपण निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःची निवास व्यवस्था असल्यास पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा.
- RTE मोफत प्रवेश योजने अंतर्गत ज्या कार्यक्षेत्रातील शाळा आपण निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःची निवास व्यवस्था नसल्यास भाडेकरार (Aggrement) ग्राह्य धरण्यात येईल. भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केलेला असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकरार जोडतील त्या निवासाची पडताळणी करण्यात येईल.
2.जन्मतारखेचा पुरावा:
- ग्रामपंचायत / नगरपालिका/ महानगरपालिका येथून मिळालेला पाल्याचा जन्म दाखला किंवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले निवेदन ग्राह्य धरण्यात येईल.
3.जातीचा दाखला:
- पाल्य जर वंचित जात संवर्गातील (SC, ST, NT, OBC, SBC, Physically Disabled) असेल तर त्याचा किंवा पालकाचा जातीचा दाखला अनिवार्य आहे. परराज्यातील जातीचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही.
4.उत्पन्नाचा दाखला:
- ज्या विद्यार्थ्याला आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेश घ्यायचा आहे अश्या विद्यार्थ्याचा पालकांचा मागील दोन वर्षाचा उत्पन्न दाखला जो तहसीलदाराने दिलेला आहे तो सादर करावा लागेल. आर्थिक दुर्बल पालकांसाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ही १ लाख रुपये इतकी आहे.उत्पन्नाचा दाखला म्हणून Salary Slip, कंपनीचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल.
- RTE मोफत प्रवेश अर्जासाठी वंचित घटकातील पालकांसाठी कोणतीही उत्पन्नाची मर्यादा नाही.
RTE मोफत प्रवेशा 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
सर्वात आधी तुमच्या राहत्या घरापासून ३ किलोमीटर परिघात कोणकोणत्या शाळेंचा समावेश होतो त्याची नोंद करून घ्या तसेच तेथे RTE अंतर्गत कोटा आहे का ते तपासून घ्या. RTE ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही त्या शाळेतून घेऊन भरू शकता किंवा ऑनलाईन भरू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे :
1)प्रथम खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर क्लिक करा.
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
2) तिथे ” Online Application” या नावावर वर क्लिक करा.
3) त्यानंतर “New Registration” या नावावर क्लिक करा.
4) यामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर एक Application Number आणि Password तयार होईल.
5) या Application Number आणि Password चा वापर करून लॉगिन करावे, या नंतर एक विस्तृत ऑनलाईन फॉर्म तुमच्या समोर आलेला असेल.
6) या ऑनलाईन फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी आणि फॉर्म सबमिट करावा. संपूर्ण माहिती खरी असावी कारण त्याची पडताळणी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.
7) सबमिट केलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून ठेवावी. नंतर प्रवेश प्रक्रिये साठी काम पडेल.
RTE मोफत प्रवेश 2023 अर्जासाठी काही महत्वाच्या सूचना :
- RTE मार्फत होणाऱ्या प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात येईल.
- या प्रवेशासाठी भरलेली सगळी माहीत खरी असावी कारण पडताळणी झाल्यावर कोणतीही माहिती खोटी आढळल्यास पाल्याचा मोफत प्रवेश रद्द करण्यात येईल.
- जर तुमच्या पाल्याचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर याचा अर्थ प्रवेश निश्चित असेलच असा नाही.
- RTE मोफत प्रवेश अंतर्गत जर कुणाला प्रवेश नाही मिळाला तर त्याला परत नोंदणी करता येणार नाही.
- पालकांनी SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी भेट देऊन माहिती घ्यावी.