Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana
Click to Join

नमस्कार मंडळी ! विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केल्या जात आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यातील OBC प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी Savitri Bai Phule Aadhar Yojana सुरू केलेली आहे, याअंतर्गत OBC प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी 60,000 रुपये सहायता निधी दिल्या जात आहे.

हा आर्थिक सहायता निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT च्या माध्यमातून ट्रान्स्फर केल्या जाईल. या योजनेतून दिल्या जाणार निधी हा विद्यार्थ्याचा जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च आणि इतर खर्चाचा अंदाज घेऊन दिला जातो.या योजने चा फायदा प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्याला होऊ शकेल यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्याला याचा फायदा नक्कीच होईल.


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची थोडक्यात माहिती:

1) योजनेचं नाव:Dyanjyoti Savitri Bai Phule Aadhar Yojana
2) संबंधित विभाग:इतर मागास बहुजन विकास विभाग
3) लाभार्थी:OBC प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थी.
4) उद्देश:विद्यार्थ्याला आर्थिक मदत देणे.
5) आर्थिक मदत रक्कम:60,000 रुपये प्रति वर्ष.
6) अर्ज करण्याची प्रक्रिया:Offline
7) अधिकृत वेबसाईट:mahadbt.maharashtra.gov.in

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे विशेष लाभ:

 • सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 60 हजार रुपयाची आर्थिक सहायता दिली जाईल.
 • शासनाद्वारे दिली जाणारी ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल.
 • या योजनेचा फायदा घेऊन विद्यार्थी आपली शैक्षणिक गरज पूर्ण करू शकणार आहे.
 • या योजनेचा फायदा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्याला होणार आहे. जे विद्यार्थी हॉस्टेल वर राहून शिक्षण घेत आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे लाभ घेता येणार आहे, ज्यामध्ये भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, आवास भत्ता ई.
 • या योजनेचा फायदा घेऊन गरीब विद्यार्थी आपली शैक्षणिक गरज पूर्ण करून उच्चशिक्षण घेऊ शकणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या धनराशी चे विवरण:

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे शहरासाठी:

 1. भोजन भत्ता – 32,000 रू.
 2. आवास भत्ता – 20,000 रू.
 3. निर्वाह भत्ता – 8,000 रू.

एकंदरीत मुख्य शहरातील विद्यार्थ्यांसाठी 60,000 रू. ची आर्थिक मदत मिळणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील शहरासाठी:

 1. भोजन भत्ता – 28,000 रू.
 2. आवास भत्ता – 8,000 रू.
 3. निर्वाह भत्ता – 15,000 रू.

एकंदरीत महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी 51,000 रू. ची आर्थिक मदत मिळणार आहे.

तालुका/नगर परिषद क्षेत्रातील शहरासाठी:

 1. भोजन भत्ता – 25,000 रू.
 2. आवास भत्ता – 12,000 रू.
 3. निर्वाह भत्ता – 6,000 रू.

एकंदरीत तालुका/नगर परिषद क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी 43,000 रू. ची आर्थिक मदत मिळणार आहे.


सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ची पात्रता काय आहे:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

 1. अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 2. अपंग श्रेणीतील अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला जिल्हा/ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचे ४०% पेक्षा जास्त अपंग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 3. अर्ज करणारा विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातील असला पाहिजे, तसे जात प्रमाणपत्र त्याच्या कडे असेल पाहिजे.
 4. अनाथ श्रेणीतून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला महिला व बालकल्याण विभागातील सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 5. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे.
 6. विद्यार्थ्याचे बँक खात त्याच्या आधार कार्ड ला लिंक असणे अनिवार्य आहे.
 7. या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी दुसऱ्या शहरात शिकायला असला पाहिजे तसेच तो हॉस्टेल वर राहणारा असावा किंवा भाड्याच्या खोलीत राहणारा असावा.

सावित्रीबाई फुले आधार योजने साठी अर्ज करायला लागणारे कागदपत्र:

 • आधार कार्ड
 • जात प्रमाणपत्र
 • निवास प्रमाणपत्र (हॉस्टेल अधिक्षकाच प्रमाणपत्र किंवा भाड्याचं रूमच करारपत्र)
 • आई वडिलांचं उत्पन्नाचा दाखला
 • 10वी आणि 12वी चे प्रमाणपत्र
 • शिकत असलेल्या विद्यालय/महाविद्यालयाचा प्रवेश प्रमाणपत्र
 • मोबाईल नंबर
 • बँक पासबुक
 • पासपोर्ट साइज फोटो.

सावित्रीबाई फुले आधार योजने साठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा:

 1. जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्जाचा फॉर्म मागून घ्या.
 2. या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
 3. त्यानंतर वर दिलेल्या कागदपत्राची झेरॉक्स कॉपी या अर्जासोबत जोडावी लागेल.
 4. त्या नंतर संबंधित अधिकाऱ्याकडे हा भरलेला फॉर्म व कागदपत्र देऊन अर्जासाठी शुल्क भरून घ्यावे.
 5. त्यानंतर या अर्जाची तपासणी होऊन तुम्ही पात्र असल्यास आर्थिक सहायता निधी तुम्हाला तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *