Shubhmangal Vivah Yojna
Click to Join

नमस्कार मंडळी ! गरीब शेतकरी व शेतमजूर यांच्या साठी व त्याच्या परिवारासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते. एखाद्या गरीब शेतकरी त्याच्या मुलीचे लग्न करायला आर्थिक दृष्ट्या कमजोर असेल तर अश्या शेतकरी व शेतमजूर यांच्या साठी शासन “शुभ मंगल विवाह (Shubh Mangal Vivah Yojna)” योजना राबवत आहे. या योजनेचा हेतू हा आहे की, गरीब शेतकरी/शेतमजूर यांच्यावर विवाहाच्या सोहळ्याचा आर्थिक बोजा पडू नये.

चला तर शुभमंगल विवाह योजनेबद्दल व या योजनेत करण्यात आलेल्या बदलाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

आता मिळणार २५ हजार रुपये:

या योजनेअंतर्गत वधु परिवाराला 10,000 रुपये मिळत होते. परंतु दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता हे अनुदान 25,000 रुपये इतके मिळणार आहे. जी जोडपी सामुहिक किंवा नोंदणीकृत पद्धतीने विवाह करतात त्यांना मंगळसूत्र व इतर संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान पूर्वी 10 हजार रुपये एवढे होते आता मात्र या अनुदानामध्ये तब्बल 15 हजार रुपयांची वाढ करून वधु परिवाराला 25 हजार एवढे अनुदान मिळणार आहे.

वधु परिवाराला तर 25000 रुपये अनुदान मिळेलच परंतु ज्या संस्था अशा प्रकारचे सामुहिक विवाह सोहळे आयोजित करत असतात त्यांना देखील शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. स्वयंसेवी संस्थाना पूर्वी 2000 रुपये अनुदान दिले जात होते. आता हे अनुदान 2500 रुपये एवढे करण्यात आले आहे. अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने म्हणजेच DBT पद्धतीने थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

शुभमंगल विवाह योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहे:

 1. सदर योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी कुटुंबाची वार्षिक कमाल उत्पन्न मर्यादा १ लाख इतकी पाहिजे.
 2. या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह करणारी संस्था नोंदणीकृत असली पाहिजे
 3. जोडप्याचे किमान वय १८ किंवा २१ वर्ष पूर्ण झाले असेल पाहिजे.
 4. वधु ही महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावी.
 5. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दाम्पत्य पात्र राहणार नाही, कारण त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत आहे.

शुभमंगल विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र:

 1. वधु वराचा जन्म नोंदणी चा दाखला.
 2. तलाठी किंवा तहसीलदार यांच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला.
 3. लाभार्थ्यांचे बँक पासबुक.

महत्वाचे मुद्दे:

 • स्वयंसेवी संस्था जर सामूहिक विवाह सोहळा घेणार असेल तर त्यांनी वरील सर्व कागदपत्रे विवाह सोहळ्याच्या किमान १ महिना अगोदर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात अर्जासोबत जमा करावे.
 • या योजनेचं अनुदान वधु च्या आईच्या बँक अकाउंट ला जमा होईल, आई हयात नसल्यास वडिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होईल.
 • वधु-वराला त्यांच्या प्रथम विवाहासाठी हे अनुदान लागू राहील. सदरचे अनुदान पुनर्विवाह साठी लागू नसेल. तथापि, वधु ही विधवा किंवा घटस्फोटित असेल तर तिच्या पुनर्विवाह साठी अनुदान लागू असेल.

या योजनेचा ३० सप्टेंबर २०११ रोजी चा GR खाली दिलेला आहे. अधिक माहितीसाठी तो वाचू शकता. धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *