Click to Join

यूपीएससी निकाल २०२३

UPSC Result 2023: नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे आणि या परीक्षेत १०१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामधे देशातून आदित्य श्रीवास्तव यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे तर अनिमेश प्रधान यांचा देशातून दुसरा क्रमांक आला आहे. देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपली छाप सोडली आहे.

वेगवेगळ्या प्रवर्गातून किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यूपीएससी २०२३ च्या निकालानुसार देशभरात १०१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वेगवेगळ्या प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांची संख्या बघू.

यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत.

विदर्भातून कोण कोण उत्तीर्ण झालं आहे.

यावेळेस यूपीएससी च्या निकालामध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांनी चांगली बाजी मारल्याची दिसून येत आहे. विदर्भातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे.

 • सुरेश बोरकर (६५८)
 • मयुरी महल्ले (७९४)
 • प्रांजली खांडेकर (७६१)
 • शुभम डोंगरदिवे (९६३)
 • राजेश्री देशमुख (६२२)
 • शुभम पवार (५६०)
 • चिन्मय बनसोड (८९३)
 • अपूर्व बालपांडे (५४६)
 • समीर खोडे (४२)
 • संस्कार गुप्ता (६२९)
 • ‌‌ऐश्वर्या उके (९४३)
 • गजानन मादेशवार (२८२)
 • अभय डागा (१८५)
 • अभिजित पाखरे (७१०)

पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून यंदा ९२ विद्यार्थ्यांनी मुलाखतीची तयारी केली होती. यातील २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे केंद्राचे संचालक डॉ. लाखे यांनी सांगितले. यावर्षी नागपूर आणि विदर्भातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल upsconline.nic.in आणि upsc.gov.in या संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहाता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *